Tuesday, 15 November 2011

नाशिक महानगर पालिका निवडणूक २०१२


नाशिक महानगर पालिका निवडणूक २०१२ चा बिगुल नुकताच वाजलाय. आपल्या शहराचे, आपल्या वार्डाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी शेकडो इच्छुकांची झुंबड उडाली आहे. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या उक्तीप्रमाणे अनेक प्रकारच्या लोकांचा यात समावेश आहे. काहि परिचित, काहि अपरिचित, काहि लोकप्रिय, काहि अपरिहार्य, काहि सक्रीय, काहि निष्क्रिय, काहि निष्कलंक, काहि  निस्पृह तर काही…

आपल्या शहराचा विकास, सामाजिक सलोखा, शांतता या भावी नगरसेवकांच्या हातात आहे. 
म्हणूनच आपल्या वार्डाचे, आपल्या शहराचे प्रतिनिधित्व करण्यासाठी चांगले लोक काळजीपूर्वक निवडणे हे प्रत्येक नाशीककराचे कर्तव्य आहे. या भावी लोकप्रतीनिधीन्बद्दल संपूर्ण माहिती नाशिककरांना उपलब्ध व्हावी जेणेकरून आपला प्रतिनिधी निवडणे आपल्याला सोपे होईल या उद्देशाने हे संकेतस्थळ  सादर करीत आहोत.

उमेदवारांसंबंधी इत्यंभूत माहिती सोबतच निवडणूक प्रक्रीयेसंबंधी सर्व ताज्या घडामोडी मतदारांपर्यंत सातत्याने पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर, शहराच्या राजकारणाची व पर्यायाने शहराच्या विकासाची दिशा व दशा सुनिश्चित होत असतांना  सर्वसामान्य  नागरीक (नागरीकांचा एक ‘दबावगट’ म्हणू या हवं तर)  देखील या प्रक्रीयेमध्ये सक्रीय असावा या उद्देशाने,  शहराच्या विकासासंदर्भात, समस्यांसंदर्भात नाशिककरांच्या भावना, मते मतांतरे व्यक्त करण्यासाठी एक सशक्त व्यासपीठ  देखील या संकेत स्थळाच्या माध्यमातून निर्माण करीत आहोत.

More Details :- http://www.nmc2012.com/

No comments:

Post a Comment